Vidhan Sabha 2019 : बोपोडीत राजकीय समीकरण बदलल्यामुळे कोणाची डोकेदुखी वाढणार? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : सध्या पुणे शहरात राजकीय समीकरणे बदलत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपाने सुरू केलेल्या मेगा भरतीत  एकापाठोपाठ प्रवेश करीत आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात या मेगा भरतीमुळे विद्यमान नगरसेवकांची कोंडी तर, होणार नाही ना, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
 

खडकी बाजार :  सध्या पुणे शहरात राजकीय समीकरणे बदलत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपाने सुरू केलेल्या मेगा भरतीत  एकापाठोपाठ प्रवेश करीत आहेत. शिवाजीनगर मतदारसंघात या मेगा भरतीमुळे विद्यमान नगरसेवकांची कोंडी तर, होणार नाही ना, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे

 Vidhan Sabha 2019 : अशी बदलली बोपोडीत राजकीय समीकरण

महापालिकेच्या मागच्या निवडणूकीत बोपोडीतून भाजपमध्ये मनसेचे नगरसेवक बंडू ढोरे व राष्ट्रवादीचे विजय शेवाळे यांनी प्रवेश करून पुणे महापालिकेची निवडणूक लढून मोठ्या मताधिकक्याने निवडून आले. या प्रभागातून भाजपचे चारही उमेदवार अर्चना मुसळे, सुनीता वाडेकर,बंडू ढोरे, विजय शेवाळे यांनी विजयश्री खेचून आणला होता. मात्र,  दोन दिवसापूर्वी बोपोडीत मेगा भरती दरम्यान काँग्रेसचे कट्टर नेते माजी मंत्री स्व. चंद्रकांत छाजेड यांचे पुत्र माजी नगरसेवक आनंद छाजेड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

याशिवाय मुकारी अलगुडे, समाधान शिंदे, हरीश निकम , खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, सदस्य सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व खडकीतील काँग्रेसचे सरचिटणीस दादा कचरे, संगीता कचरे, संदीप अहिर, यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे आता पुढे बोपोडीत राजकारण ढवळून निघणार आहे.

Vidhan Sabha 2019 :  निष्ठावंत दुर्लक्षितच

मोदी लाटेच्या आधीपासून खडकीत काही निष्ठावंत भाजपचे नेटाने काम करीत होते ते आजही पक्षात आहेत. मावळते आमदार विजय काळे यांनी देखील या एकनिष्ठ कार्यकर्त्याऐवजी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील काँग्रेस सदस्यांना बरोबर घेऊन काम केले होते. त्यामुळे निष्ठावंत दुर्लक्षितच राहिले. 

आता भापकर, चासकर, कांबळे, आणि सावंत या सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे निष्ठावंत पुन्हा उपाशीच राहणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. छाजेड यांच्या पक्ष प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पक्षांतर्गत संघर्ष तीव्र होऊ शकतो. विद्यमान नगरसेवकांना तर याचा फटका बसणार नाही ना, याची चर्चा निवडणुकीला अडीच वर्षे बाकी असतानाच,आतापासूनच सुरू झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political equation changes at Bopodi in Maharashtra Vidhan Sabha 2019