
माळेगाव : माळेगाव (ता.बारामती) कारखाना निवडणूक निमित्ताने प्रचार शुभारंभाचा नारळ फोडण्याचे नियोजन सत्ताधारी व विरोधकांनी उद्या सोमवारी (ता. २) केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव येथे सत्ताधाऱ्यांचा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे, तर पारंपारिक विरोधी नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे हे सांगवी गावातून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.शरद पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी गावोगावी गाठीभेठी सुरू केल्या आहेत. वास्तविक सत्ताधारी व विरोधकांच्या बाजूने गट निहाय संभाव्य उमेदवारांमध्ये तिकीट वाटपाची कसरत सुरू असताना या नेते मंडळींनी प्रचाराच्या माध्यमातून रान तापविण्याचा प्रयत्न केला आहे.