

लोणी काळभोर, ता. १२ : ‘‘लोकशाहीत सक्षम नेतृत्व घडविण्यासाठी व्यावहारिक शिक्षण आवश्यक आहे. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांची जाण ठेवून जबाबदाऱ्या पेलण्यासाठी सज्ज राहावे. विद्यार्थ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी घेऊन प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेचा अनुभव घ्यावा,’’ असा सल्ला राज्यसभा खासदार डॉ. राधा मोहन दास अग्रवाल यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटच्या (मिटसॉग) वतीने आयोजित मास्टर्स इन पॉलिटिकल लीडरशिप अँड गव्हर्न्मेंट अभ्यासक्रमाच्या २२व्या बॅचच्या दीक्षारंभप्रसंगी डॉ. अग्रवाल बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिटसॉगचे संस्थापक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड होते. यावेळी आंध्र प्रदेशचे राज्यसभा खासदार विजय चिंताकायल, आमदार सुमीत वानखेडे, आमदार हेमंत ओगले, कुलगुरू डॉ. रविराज सीताराम उपस्थित होते.
डॉ. अग्रवाल पुढे म्हणाले की, राजकारणात पैशांपेक्षा जनतेच्या समस्या समजून घेण्याची क्षमता महत्त्वाची आहे. पैशांच्या जोरावर राजकारणावर वर्चस्व निर्माण करण्याची विचारधारा बदलण्याची गरज आहे. करुणानिधी, जयललिता आणि ज्ञानी झैलसिंग यांसारख्या नेत्यांनी व्यावहारिक ज्ञानाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण केली. राजकारणात यश मिळविण्यासाठी प्रभावी वक्तृत्व आणि जबाबदारीची जाणीव आवश्यक आहे.
खासदार चिंताकायल यांनी राष्ट्रउभारणीसाठी लोकशाहीप्रती समर्पित नेतृत्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केली. वानखेडे यांनी ग्रामीण आणि शहरी भागांतील आव्हाने समजून घेण्याचे आवाहन केले. ओगले यांनी राजकीय कार्यात संयम आणि स्पष्ट कार्यदिशा महत्त्वाची असल्याचे सांगितले. एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात उपस्थित होते. एसओजीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. डॉ. नमेश किलेमशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. प्रगती पटेल आणि अनुष्का गावंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गोपाळ वामणे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.