pune municipal corporation
sakal
पुणे - पुणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर प्रशासनाने १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीची पुनर्रचना केली असून, यामध्ये भाजप १४ तर काँग्रेसकडे एक क्षेत्रीय कार्यालय असणार आहे. तर भाजपच्या खेळीमुळे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ नगरसेवक असूनही एकही कार्यालय ताब्यात ठेवता आलेला नाही. या राजकीय डावपेचात क्षेत्रीय कार्यालय लांब पडणार असल्याने नागरिकांचे पाच वर्ष हाल होणार आहेत.