
माळेगाव : बारामती तालुक्याच्या राजकारणात माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक खूप महत्त्वाची असते. त्या पार्श्वभूमीवर या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सत्ताधारी, भाजप पक्षाचे विरोधक व कष्ठकरी शेतकरी समितीने संभाव्य उमेदवारांच्या नावांसाठी चाचपणी सुरू केली आहे. वरील निवडणूकीत तुल्यबल लढतींसाठी उमेदवारांच्या नावांची चाचपणी करण्यासाठी गावोगावी संबंधित पदाधिकाऱ्यांचा गुप्त बैठकांचा धडाका सुरू आहे. त्या प्रक्रियेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. युगेंद्र पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.