Uruli Kanchan News: गाव विकास कोमात, ग्रामपंचायत ‘इव्हेंट मॅनेजमेंट प्लेस’मध्ये; उरुळी कांचनमध्ये वाढदिवस सेलिब्रेशनवर ग्रामस्थांचा संताप

ग्रामपंचायत ‘मिनी मंत्रालय’ की इव्हेंट मॅनेजमेंट प्लेस? विकासाच्या प्रश्नांना बगल देत वाढदिवस, केक‑बुके आणि फोटोसेशनचा जल्लोष; ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
हीच ती ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत जेथे वाढदिवसाचे सेलेब्रेशन होते.

हीच ती ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत जेथे वाढदिवसाचे सेलेब्रेशन होते.

Sakal

Updated on

उरुळी कांचन : ग्रामसचिवालय जनतेचे प्रश्न सोडवायला का फक्त वाढदिवस साजरे करायला अशी पारावरची चर्चा उरुळी कांचन गावात जोर धरू लागली आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि गावाच्या विकासाची सखोल धोरणे ठरवण्यासाठी खरे तर हे सचिवालय म्हणजेच मिनी मंत्रालय, देखणे आणि गावाच्या वैभवात भर टाकणारे असे साकारले आहे.मात्र याठिकाणी सध्या असणाऱ्या प्रशासकीय राजवटीत विकासाच्या कामांऐवजी 'वाढदिवसांच्या सेलिब्रेशन'मुळे ते जास्त चर्चेत आले आहे. ग्रामसचिवालय कार्यालयाचा वापर चक्क वाढदिवसाचे बुके देण्यासाठी,केक कापण्यासाठी आणि गर्दी जमवण्यासाठी होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com