Harshwardhan Patil and Dattatray Bharane
sakal
इंदापूर - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेर च्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. यामध्ये कट्टर राजकीय विरोधक असलेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येत घड्याळाच्या चिन्हावर समर्थकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदीप गारटकर व प्रवीण माने यांनी पक्षातील कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीतील बंडखोरांना बरोबर घेत आव्हान उभे केले आहे.