Vidhan Sabha 2019 : खडकवासल्यातील 'ते' मतदान केंद्र अतिसंवेदनशील 

राजेंद्रकृष्ण कापसे
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019  : खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण 446 मतदान केंद्र असून त्यातील 13 संवेदनशील, तर एक अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहे. खेड शिवापूर येथील 431 क्रमांकाचे मतदान केंद्र आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांची माहिती दिली. 

Vidhan Sabha 2019 : खडकवासला : खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण 446 मतदान केंद्र असून त्यातील 13 संवेदनशील, तर एक अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहे. खेड शिवापूर येथील 431 क्रमांकाचे मतदान केंद्र आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांची माहिती दिली. 

खेड शिवापूर येथील या मतदान केंद्रावर एका निवडणुकीत ईव्हीएम मशीन फोडण्याचा प्रकार घडला होता. यामुळे हे मतदान केंद्र निवडणूक आयोगाच्या अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून जाहीर केले असल्याचे बारवकर यांनी सांगितले. अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्रावर सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही यंत्रणा, वायरलेस फोन यंत्रणा, पोलिस, केंद्रीय राखीव पोलिस (सीआरपीएफ) दलाचे जवान बंदोबस्ताला असणार आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दोन हजार 230 एवढे मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असून इव्हीएम मशीन, बॅलेट युनीट आणि व्हिव्हीपॅट या सर्वांसाठी 90 बसेस, 47 जीप आणि परिरस्थितीनुसार अतिरीक्त वाहनांचे नियोजन केले असल्याचे बारवकर यांनी सांगितले.

- 7 ऑक्‍टोबरला माघार घेण्याचा दिवस आहे. (दुपारी 3 वाजेपर्यंत)
- 7 ऑक्‍टोबरला दुपारी तीननंतर चिन्ह वाटप.
- 7 ऑक्टोबर उमेदवारांची यादी प्रसिध्द करणार 

सखी मतदान केंद्र 
महिलांचे सुमारे 50 टक्के मतदान असते. ते मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी प्रत्येक मतदार संघात एक सखी मतदान केंद्र उभारले जाते. या उद्देशाने हे केंद्र असून, या केंद्रामध्ये अधिकारी व कर्मचारी महिला असतात. वारजे येथील मतदान केंद्र क्रमांक 86 हे सखी मतदान केंद्र असणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This polling station of Khed shivapur in Khadakwasla is very sensitive for Maharashtra Vidhan Sabha 2019