

PNE26W64493
फोटोओळ :
सोलापूर : नू. म. वि. मराठी शाळेत दिवाळी उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना ‘दिवाळी सुट्टीतील आनंददायी अभ्यास’ या पुस्तकाचे वाटप करताना संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक.
नू. म. वि.च्या विद्यार्थ्यांचा फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प
मातीच्या पणत्या लावण्यासह प्रदूषणमुक्त सणाचा संदेश; दिवाळी सुट्टीतील आनंददायी अभ्यास पुस्तकाचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण टाळून यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचा संकल्प नू. म. वि. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी केला. प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ घेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. बुधवारी (ता. ४) शाळेत दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्रद्धा करकमकर-पांढरे, कमल स्वामी, मुख्याध्यापिका स्मिता माळवदकर, सदस्य सुरेश मंकणी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ॲड. मोनिका दामले यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. रेणुका हिरेमठ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पाहुण्यांच्या हस्ते पणत्या प्रज्वलित करून किल्ल्याचे पूजन करण्यात आले.
इयत्ता पहिलीच्या (बकुळ) विद्यार्थिनींनी ‘हसू, नाचू, गाऊ आली दिवाळी’ या गीतावर नृत्य सादर केले. त्यांना सुवर्णा दुधाळ यांचे मार्गदर्शन लाभले. सविता नवगिरे यांनी विद्यार्थ्यांसह दिवाळीच्या सहा दिवसांचे नाट्यरूप सादरीकरण केले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि ‘दिवाळी सुट्टीतील आनंददायी अभ्यास’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. जून ते ऑक्टोबर या कालावधीत वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. शिक्षकांनाही शाळेतर्फे दिवाळी भेट देण्यात आली. संगीता बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी चौधरी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.