

Unseasonal Rain and Hailstorm Devastate Junnar Farms
Sakal
नारायणगाव : जुन्नर तालुक्याच्या पूर्व व मध्य भागात आज सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. बांगरवाडी परिसरात सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे डाळिंब, आंबा,टोमॅटो, शेतात झाकून ठेवलेला कांदा, उन्हाळी बाजरी सह इतर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.