डाळिंब बागांना क्रॉप कव्हरचे आच्छादन

डाळिंब बागांना क्रॉप कव्हरचे आच्छादन
Published on

टाकळी हाजी, ता २० : टाकळी हाजी परिसरात (ता. शिरूर) वाढत्या उन्हाच्या पारापासून डाळिंब फळाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी नायलॉन कापडाचे सुरक्षा कवचे (क्रॉप कव्हर) आच्छादन डाळिंब बागेवर घालण्याची लगबग सुरू आहे. क्रॉप कव्हर संरक्षणात येथील निर्यातक्षम डाळिंबाचे फळ बहरत आहे.
शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड झालेली आहे. डाळिंब पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी डाळिंब लागवडीकडे वळले आहेत. तालुक्यातील पश्चिम भागातील टाकळी हाजी, फाकटे, वडनेर, पिंपरखेड, जांबूत, मलठण, कवठे येमाई, आमदाबाद येथे माळरानावरील हजारो हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा फुलल्या आहेत. तरुण वर्ग डाळिंब शेतीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे. टाकळी हाजीत सुमारे दीड ते दोन लाख रोपांची लागवड झाली आहे. तर जुन्या बागा ही मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या सुमारे हजार हेक्टर वर डाळिंबाची पिके जोमात असून त्यांना चांगले दर्जेदार फळे आलेले आहेत.
सध्या शिरूर तालुक्याचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाते. डाळिंब उत्पादकाला डाळिंब फळास उन्हाचे चटके बसून, डाग पडण्याची भीती वाटत आहे. जर उन्हामुळे फळाला डाग पडला तर ते मातीमोल होते. त्यामुळे डाळिंब पिका फळाचे उन्हापासून संरक्षण करणे महत्त्वाचे झाले आहे. त्यासाठी शेतकरी नायलॉनचे कापड खरेदी करीत आहेत. हे कापड संपूर्ण बागेवर झाडांच्या आच्छादित करीत आहेत. त्याला बांबूने आधार दिला आहे.

कापड, बांबूसाठी एकरी ५० हजारांचा खर्च
फेबुवारीअखेरपर्यंत क्रॉप कव्हर टाकण्याचे काम पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. कापड, बांबू, मजुरी या साठी एकरी ५० हजार रुपये खर्च येतो. या परिसरातील बागा सध्या सफेद कापडाने आच्छादल्या असल्यामुळे सर्व बागा पांढरा शुभ्र दिसत आहेत. यावर्षी निसर्गाचे कोणते संकट न आल्यास या परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याने शेतकरी डाळिंबाला जिवापाड जपत आहे.


उन्हाचे चटके डाळिंब फळाला बसू नये म्हणून फळास क्रॉप कव्हरचे अच्छादन अंत्यत महत्त्वाचे आहे. उन्हापासून तसेच कीड रोगांपासून संरक्षण होऊन फळाचा दर्जा उत्तम मिळतो. बाजारभावही चांगला मिळतो.
- सुवर्णा आदक, कृषी अधिकारी शिरूर

उन्हाची तीव्रता वाढत वाढत आहे. त्यापासून वाचण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर फायद्याचा ठरतो. त्यांच्या वापराने फळाची गुणवत्ता व दर्जा चांगला मिळतो व निर्यातक्षम फळे येतात.
- संकेत घोडे, डाळिंब उत्पादक

00886

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com