मंगल ढोक यांची यशोगाथा

मंगल ढोक यांची यशोगाथा

Published on

डाळिंबाने वाढवली
संसाराची गोडी

मंगल ढोक यांची कोट्यवधींची कमाई

माणसारख्या अवर्षणप्रवण तालुक्यातील बिदाल या पाणीटंचाई असणाऱ्या गावातील मंगल सतीश ढोक यांनी डाळिंबाच्या यशस्वी शेतीतून संसाराची गोडी वाढवली आहे. आधुनिक शेती करत कोट्यवधी रुपयांची कमाई करण्याची किमया त्यांनी यातून साधली आहे.
कला शाखेतून पदव्युत्तर पदवी, तसेच बीएड असं चांगलं शिक्षण घेतलेल्या मंगल ढोक यांनी २००५ पासून शेती करायला सुरुवात केली. प्रथम शेती करताना त्यांना खूप त्रास होत होता; परंतु मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शेतीचं तंत्र आत्मसात केले. सततच्या दुष्काळाला सामोरे जात असताना शेतीत नवीन काय करता येईल याचा विचार करण्यास त्यांनी सुरुवात केली. आपल्या भागात कोणत्या पिकाला वातावरण चांगले आहे व पाण्याची उपलब्धता आहे याचा विचार करून शेतीत पावले टाकली.
शेती करताना त्यांना शिक्षक असलेले पती सतीश ढोक यांची मोलाची साथ मिळाली. पतीच्या मार्गदर्शनाखाली ते शाळेत गेल्यानंतर सर्व शेतीची जबाबदारी सांभाळण्याचं काम मंगल या करत होत्या. त्यातून त्यांना डाळिंब शेतीची आवड निर्माण झाली. अभ्यास करून मंगल यांनी डाळिंब शेती करण्यास सुरुवात केली. डाळिंबाच्या तीनशे झाडांपासून सुरुवात केल्यानंतर आज त्यांच्याकडे तीन हजार झाडे आहेत. खूप मेहनत व अभ्यास करून त्या डाळिंब शेती करत आहेत.
अव्वल दर्जाचे उत्पादन घेऊन २००९ ते २०१९ अखेर युरोप बाजारपेठेत आपल्या डाळिंबाची त्यांनी निर्यात केली. डाळिंब निर्यात करताना त्यांना खूप अनुभव आले, शिकायला मिळाले व चांगले उत्पन्न सुद्धा मिळाले. एक आदर्श, प्रयोगशील व डाळिंबाच्या शेतीतून कोट्यवधींचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरी म्हणून त्यांचा परिसरात नावलौकिक आहे.

...........

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंब शेती केली, तर उत्पादन चांगले मिळते. डाळिंब शेतीतून मला माझ्या कुटुंबाचा आर्थिक स्तर मोठ्या प्रमाणात उंचावता आला, तसेच मला सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- मंगल ढोक, प्रगतशील शेतकरी, बिदाल.
...........
छायाचित्र:.........
MLV26B07354 & MLV26B07355
मंगल ढोक
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com