पूजा भागवत यांना सौंदर्यवतीचा मुकूट

दिवा पॅजंट्सच्यावतीने ही स्पर्धा नुकतीच झाली. या वेळी अभिनेत्री आणि माजी ‘मिस इंडिया’ इशा कोप्पीकर उपस्थित होत्या.
Pooja Bhagwat, mrs india empress of the nation 2024
पूजा भागवत | Pooja BhagwatPooja Bhagwat Instagram
Updated on

पुणे : ‘मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन’च्या पाचव्या सोहळ्यात एलिट विभागात पूजा भागवत यांनी सौंदर्यवतीचा मुकुट मिळविला. देशभरातील ५४ स्पर्धकांमध्ये त्यांनी सादरीकरण, वावर, प्रश्नोत्तरे अशा सर्वच विभागांत सरस कामगिरी केली.

दिवा पॅजंट्सच्यावतीने ही स्पर्धा नुकतीच झाली. या वेळी अभिनेत्री आणि माजी ‘मिस इंडिया’ इशा कोप्पीकर उपस्थित होत्या. सौंदर्य सोहळ्यातील सर्व बारकाव्यांचे प्रशिक्षण सहभागी सौंदर्यवतींना देण्यात आले. त्यात प्रश्नोत्तरे, रॅम्प वॉक, वैयक्तिक प्रशिक्षणाचाही समावेश होता. चार दिवसांच्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी निवड झाली. हॉटेल हयातचे महाव्यवस्थापक संदीप सिंग, मीशा डायग्नोस्टिक्स अँड पॉलीक्लिनिकच्या डॉ. लीना गुप्ता, दिवा पॅजंट्सचे कार्ल मस्करेन्हास, दिवा क्वीन अपेक्षा डबराल, मिसेस एशिया पॅसिफिक स्पर्धेतील उपविजेती आरती गौतम यांचा परिक्षकांमध्ये समावेश होता. नृत्यदिग्दर्शक पूजा सिंग यांनी सहकार्य केले.

स्पर्धेतील विजेते: 

  •  एलिट विभाग :

 विजेती : पूजा भागवत, पहिली उपविजेती : सुषमा शर्मा, दुसऱ्या उपविजेत्या : शैलजा मधोक.

  •  गोल्डन विभाग : 

विजेती : मनीषा आनंद, प्रथम उपविजेत्या : सई खलाटे, दुसऱ्या उपविजेत्या : अनिता 

माजू.

  • सिल्व्हर विभाग : 

विजेती : डिंपल डिसूझा, प्रथम उपविजेत्या : डॉ अनुश्री पांडे, दुसऱ्या उपविजेती : शिखा शर्मा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.