
पूजाचा लॅपटॉप आणून देण्याबाबतब वानवडी पोलिसांनी धनराज घोगरे पाठवली नोटीस
पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी : सत्य लपवण्यासाठी भाजपच्या नगरसेवकावर दबाव : जगदीश मुळीक
घोरपडी (पुणे): "वानवडी पोलीस भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सरकारच्या दबावामुळे करत आहेत. या केसमध्ये एक मंत्र्याचा राजीनामा घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये. तसेच सत्य लपवण्यासाठी आणि भाजपच्या नगरसेवकावर दबाव टाकण्यासाठी अशी नोटीस पाठवली जात आहे. आम्ही कोणत्याही नोटीसीला घाबरणार नाही" असे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वानवडीमध्ये आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाणचा लॅपटॉप भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे असल्याचा संशय पुणे पोलिसांना आहे. यामुळे काल वानवडी पोलिसांनी पूजाचा लॅपटॉप आणून द्या अशी नोटीस घोगरे यांना पाठवली आहे. त्यासंदर्भात आज पुणे भाजपा वतीने एक शिष्ठमंडळ वानवडी स्टेशनला भेटीसाठी आले होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक धनराज घोगरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, सरचिटणीस दीपक पोटे, सुरेश तेलंग, हरीश गेलरू उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यावेळी बोलताना नगरसेवक धनराज घोगरे यांनी सांगितले की, मी माणुसकीच्या नात्याने त्या मुलीची मदत करण्यासाठी गेलो होतो, माझ्याकडे कोणताही लॅपटॉप नाही. माझ्या कार्यकर्त्याला मोबाईल सापडला होता, तो आम्ही त्याच दिवशी पोलिसांकडे जमा केला आहे. पण मी भाजपा नगरसेवक असल्यामुळे नोटीस पाठवून माझ्यावर दबाव आणला जात आहे. मी कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही.
पत्रकारांशी बोलताना महापौर मुरलीधर मोहळ म्हणाले की, ''पोलिस गुन्हेगाराना साक्षीदार करत असून साक्षीदार असलेल्या घोगरे यांना गुन्हेगार ठरवत आहे. पोलिसांना आमचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी या प्रकरणाची माहिती दिली तसेच त्यांना मदत केली त्यांनाच पोलिस मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. जर आमच्या नगरसेवकांना त्रास झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू'' असा इशारा महापौर यांनी दिला आहे.
या प्रकरणातील १२ ऑडिओ क्लीप व काही फोटो व्हायरल झाले आहेत. तसेच ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्या तसेच त्याचे काही कागदपत्रे काढून घेतले अशी चर्चा होती. काल अखेर पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच नोटीसमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिखळण्याची चिन्ह दिसत आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
Web Title: Pooja Chavan Death Case Bjp Corporator Being Pressured Hide Truth Said Jagdish Mulik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..