पूजा ढमाले हिची 
‘सीएसए’पदी निवड

पूजा ढमाले हिची ‘सीएसए’पदी निवड

Published on

मंचर, ता. ३ : पेठ (ता. आंबेगाव) येथील श्री वाकेश्वर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी पूजा रामदास ढमाले हिने बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत बँक ऑफ इंडियामध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट (सीएसए) पदासाठी पात्रता मिळवली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील पूजाने मिळवलेले हे यश प्रेरणादायी मानले जात आहे.
भारतीय बँकिंग क्षेत्रातील भरती प्रक्रिया राबविणाऱ्या Institute of Banking Personnel Selection (आयबीपीएस) या स्वायत्त संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत पूजाने यश मिळवले. त्यानुसार तिची बॅक आॅफ इंडिया तसेच स्टेट बॅंक आॅफ इंडिया या देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ज्युनिअर असोसिएट पदावर निवड झाली आहे.
या दुहेरी यशाबद्दल पेठ ग्रामस्थांच्या वतीने पूजा, आई सीता व वडील रामदास यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पूजाने अत्यंत कठीण परिस्थितीत आई-वडिलांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण करून दिल्याचे सांगितले. बीएससी फिजिक्स उच्च शिक्षणासाठी कुटुंबाने सातत्याने दिलेली प्रेरणा, व त्यानंतर बँकिंग क्षेत्रातील परीक्षेसाठी चिकाटी, आत्मविश्वास आणि जिद्दीने केलेला अभ्यास यामुळेच पहिल्याच प्रयत्नात हे यश शक्य झाल्याचे पूजाने सांगितले.
सत्कार समारंभास पंचायत समिती सदस्य संजय पवळे, माजी सरपंच संतोष धुमाळ, राम तोडकर, मंगेश पवळे, बाळासाहेब पवळे, साधना धुमाळ, मनोहर कंधारे, बबन महाराज शिंदे, संभाजीराव काळे, सेवानिवृत्त आर्मी अधिकारी दत्तात्रेय ढमाले, प्रमोद धुमाळ, प्राचार्य भानुदास धुमाळ व शिक्षक उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com