पूजा चव्हाणच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं?

pooja lahu chavan suicide detailed postmortem report
pooja lahu chavan suicide detailed postmortem report

पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिची आत्महत्या आहे की खून, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पूजाच्या मृत्यूनंतर शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, मृत्युला आणखी काही कारणे असू शकतात का, याचा उलगडा शवविच्छेदनाच्या सविस्तर अहवालामधून मिळण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे शवविच्छेदनाच्या सविस्तर अहवालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महिला आयोगाने घेतली दखल
पूजा चव्हाण हिने 7 फेब्रुवारीला मध्यरात्री वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. टिकटॉक स्टार असलेल्या पूजाच्या आत्महत्येच्या घटनेची बातमी सोशल मीडीयावर पसरताच तिच्या असंख्य फॉलोअर्सला मोठा धक्का बसला. त्याचबरोबर दुसरीकडे तिचे महाआघाडी सरकारमधील एका राज्यमंत्र्याशी प्रेमसंबंध असल्याची तसेच तिच्या आत्महत्येनंतर एका व्यक्तीने तिच्या नातेवाईकाशी सातत्याने मोबाईलद्वारे संपर्क ठेवला होता. त्यामुळे संबंधित मंत्र्याविरुद्ध विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात टिका करून रान उठविले होते. त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाच्या आत्तापर्यंतच्या चौकशीचा अहवाल तातडीने देण्याचा आदेश पुणे पोलिसांना दिला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मृत्यूचं आणखी काही कारण?
या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच पूजाची लहान बहिणी दिया चव्हाण हिने इन्स्टाग्रामवर 13 फेब्रुवारीला "माझी बहीण बाघीण होती, ती असे करू शकत नाही, जर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला असेल, तर त्यामध्ये कुठले तरी मोठे कारण असेल' अशी पोस्ट टाकली. त्यामुळे पूजाने खरोखरच आत्महत्या केली आहे की, तिचा खून झाला आहे. याविषयीची जोरदार चर्चा सुरु झाली. दरम्यान, पुजाचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल मिळाल्याचा दावा वानवडी पोलिसांना मिळाला. त्यामध्ये डोक्‍याला व मणक्‍याला जबर दुखापत झाल्याने पूजाचा मृत्यू झाल्याचे अहवालामध्ये नमूद केले असल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले. मात्र, या अहवालामध्ये मृत्यू होण्यास आणखी काही कारणे आहेत का? याबाबत कुठलीही माहिती आलेली नाही. ही माहिती शवविच्छेदनाच्या सविस्तर अहवालामध्ये येण्याची शक्‍यता आहे. परंतु, हा अहवाल पोलिसांना केव्हा येईल, याबाबत सांगता येत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com