नगरसेवक लेकीसह सदस्यांचा सत्कार.....
BEG26B01869
बेगमपूर (ता. मंगळवेढा) : येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सचिन जाधव. यावेळी उपस्थित अस्लम चौधरी, प्रभाकर काशीद, लक्ष्मण माने आदी.
---
नगरसेवक झालेल्या लेकीसह
जि.प.,पं.स. सदस्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
बेगमपूर, ता. २३ : येथील (कै.) सोपान सौदागर कावळे यांची लेक व सध्या सोलापूरच्या रहिवासी असलेल्या पूनम प्रभाकर काशीद या नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. कुटुंबातील लेक नगरसेवक झाली, या आनंदाप्रीत्यर्थ आपल्या लेकीसह या भागातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे कावळे कुटुंबीयांनी आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी कुरुल जिल्हा परिषद गटाचे सदस्य सचिन जाधव होते. प्रमुख म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक पूनम काशीद, घोडेश्वर पंचायत समिती गणाचे सदस्य अस्लम चौधरी व माजी नगरसेवक प्रभाकर काशीद उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी सौदागर कावळे, दिगंबर कावळे, माजी उपसरपंच हणमंत कावळे, कावळे कुटुंबीय, माजी सरपंच लक्ष्मण माने, हरिभाऊ काकडे, युवा नेते सोमनाथ कसबे, सचिन भोई आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जनतेने विश्वास ठेवून निवडून दिले. कावळे परिवाराने कुटुंबातील लेकीबरोबरच आमचाही सत्कार घडवून आणला. जनतेचे हे प्रेम कधीच विसरता येणार नाही. मतदार संघातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांनी व्यक्त केले. पंचायत समिती सदस्य अस्लम चौधरी, माजी नगरसेवक प्रभाकर काशीद यांनी मनोगत व्यक्त केले. हणमंत कावळे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

