पंढरपूर डाक विभागात पी एल आय व आर पी एल आय विभागात पुनम सोनार  सर्वप्रथम

पंढरपूर डाक विभागात पी एल आय व आर पी एल आय विभागात पुनम सोनार सर्वप्रथम

Published on

MLS26B02606
पंढरपूर : माळशिरस पोस्ट विभागातील पोस्टल असिस्टंट पुनम सोनार यांचा सन्मान करताना डाकघर अधीक्षक मुन्ना कुमार, यावेळी उपस्थित हेड पोस्टमास्टर सोमनाथ गायकवाड व इतर.
........
पुनम सोनार पंढरपूर डिव्हिजनमध्ये प्रथम
.......
माळशिरस : माळशिरस पोस्ट विभागातील पोस्टल असिस्टंट पुनम मंगेश सोनार यांनी आरपीएलआय व पीएलआय विभागात पंढरपूर डिव्हिजनमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पंढरपूर डाक विभागाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पंढरपूर डाक विभागाचे डाकघर अधीक्षक मुन्ना कुमार, सहायक डाकघर अधीक्षक राजेश शर्मा, हेड पोस्टमास्टर सोमनाथ गायकवाड, एम. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पुनम सोनार यांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना डाकघर अधीक्षक मुन्ना कुमार यांनी पोस्टाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे आवाहन केले. विशेषतः टपाल ग्रामीण जीवन विमा (आरपीएलआय) योजनेचे महत्त्व लोकांना पटवून देत पोस्टाचा व्यवसाय वाढविण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच पोस्टाचे ग्राहक आणि पोस्टल कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात पंढरपूर डिव्हिजनमधील इतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी पंढरपूर विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com