सय्यदनगर ते हांडेवाडी रस्त्याची दुरवस्था; तत्काळ दुरुस्ती न केल्यास हडपसरकर काढणार मोर्चा

संदीप जगदाळे
Monday, 14 September 2020

सय्यदनगर ते हांडेवाडी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न पडावा इतकी भयानक अवस्था आहे. हीच परिस्थिती हडपसरमधील अनेक रस्त्यांची आहे, अशी तक्रार येथील रहिवासी संजय जाधव यांनी करत या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली. 

हडपसर (पुणे) : सय्यदनगर ते हांडेवाडी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न पडावा इतकी भयानक अवस्था आहे. हीच परिस्थिती हडपसरमधील अनेक रस्त्यांची आहे, अशी तक्रार येथील रहिवासी संजय जाधव यांनी करत या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

याबाबत त्यांनी महापालिकेकडे निवेदन दिले असून आठ दिवसात या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास येथील स्थानिक नागरिक महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 
दरम्यान, याबाबत रहिवासी कविता सरोदे म्हणाल्या, "दरवर्षी पावसाळा आला की, रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. दरवर्षी नवीन रस्ता तयार केला. तरी बऱ्याच ठिकाणी पावसाळा झाल्यावर रस्त्याची चाळण होते. खड्डे चुकविण्याच्या नादात कधीतरी बॅलन्स जाऊन अपघाताच्या घटना घडतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेने डागडुजीपोटी ज्या रस्त्यांवर लाखो रुपये खर्च केले, त्यावर पावसाने खड्डे पडले. अशा रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, तरीही संबंधित ठेकेदारांवर कारवाई होत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. 
-संदीप मोरे, स्थानिक नागरिक 

 

रस्ते तयार करताना आवश्‍यक असलेले निकष पाळले जात नाहीत, त्यामुळे हे रस्त्यांवर खड्डे पडतात. मात्र, गेल्या काही वर्षात निकृष्ट दर्जाबाबत ठेकेदारांवर प्रशासनाने कारवाई केल्याचे दिसून येत नाही. तसेच या प्रकरणी संबंधित विभागाच्या अभियंत्यांची जबाबदारी तितकीच महत्त्वाची असते. मात्र, या दोन्हीही नामानिराळे राहतात. 
-साबीर शेख, स्थानिक नागरिक 

 

शहरात सद्यस्थितीला महावितरण, एमएनजीएल आणि विविध मोबाईल कंपन्यांकडून खोदाईची कामे सुरू असतात. त्यामुळे रस्ते वारंवार खोदले जातात. काम झाल्यानंतर त्यावर डांबर अथवा सिमेंट कॉंक्रिट केले जाते. मात्र, त्याचा दर्जा निकृष्ट असल्याने पुन्हा रस्त्यांची दुरवस्था होते. 
डॉ. संतोष कवितके 

 

खड्डे बुजविण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. हडपसरमधील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खड्डे बुजविण्यात येतील. 
व्ही. जी. कुलकर्णी, उपआयुक्त, पथ विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor condition of Sayyednagar to Handewadi road