Road Work : निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता खचला; दुर्घटना टळली

निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे शिनोली (बोडकी, ता. आंबेगाव) श्री. क्षेत्र भीमाशंकरकडे जाणारा रस्ता खचल्याने वाहतुक एकेरी करण्यात आली.
road bumpy
road bumpysakal

शिनोली - निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे शिनोली (बोडकी, ता. आंबेगाव) श्री. क्षेत्र भीमाशंकरकडे जाणारा रस्ता खचल्याने वाहतुक एकेरी करण्यात आली. मोहरम व रविवार सार्जनिक सुट्टया असल्याने व श्रावण अधिक मास असल्याने श्री. क्षेत्र भीमाशंकरला उच्चांकी गर्दी होती.

सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. सदर कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरीक करीत आहेत. रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे चालु आहे. याबाबतचीची बातमी 'दैनिक सकाळ'मध्ये १७ जुलै रोजी प्रसिध्द झाली होती.

सदर बातमीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव व गुणनियंक विभाग पुणे यांनी दुर्लक्ष केले. अखेर रविवार (काल) रात्री १२.३० वाजलेचे दरम्यान रस्ता खचला. मो-यांचे व नदीकाठच्या संरक्षण भिंतीचे फाउंडेशन बांधकाम काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.

सदर कामाची सार्वजनिक बांधकाम विभाग गुणंनियंत्रक विभागाकडून चौकशी व्हावी व संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय शेळके, विद्यमान संचालक संदीप चपटे व आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक जिजाराम येवले यांनी केली होती.

देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांना चांगल्या सुख सुविधा मिळावी यासाठी राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून शिनोली ते पिंपळगाव या रस्त्यावर मो-यांचे बांधकाम व संरक्षण भिंत व दीड किलोमीटर रस्त्यासाठी अर्थसंकल्प निधीतून सुमारे साडेपाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला.

यामध्ये शिनोली ते पिंपळगाव रस्त्यावर दहा मो-या, बोडकी या ठिकाणी संरक्षण भिंत व दीड किलोमीटरचा डांबरीकरण रस्ता याचा समावेश आहे. बोडकी परिसरात संरक्षण भिंतीचे काम चालू आहे. सदर काम नदीपात्रातून सुमारे ७० ते८० फूट उंचीवर चालू आहे.

सदर संरक्षण भिंत बांधताना तळामध्ये मुरूम अथवा खडक अशी कोणतीही परिस्थिती नसताना नदीच्या पात्रात केवटा मातीमध्ये फाउंडेशन करून संरक्षण भिंतीचे बांधकाम चालू आहे. शिनोली परिसरात अजून जोराचा पाऊस झाला नाही. ओढे, नाले यांना पूर आला नाही. डोंगर अजून उपाळले नाहीत. व या रस्त्याच्या साईड गटारातून पाणी वाहत नसताना सुद्धा रस्ता खचुन गेला.

नदीला पूर आल्यानंतर संरक्षण भिंतीखालची माती वाहून गेल्यानंतर भिंत कोसळण्याचा धोका आहे. अजून मुसळधार पाऊस झाला नाही. मुसळधार पाऊस झाल्यास रस्त्याच्या साईड गटारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानंतर माती भराव्यातील मो-या वाहून जाऊ शकतात.

रात्री १२.३० वाजता रस्ता खचल्यानंतर घोडेगाव पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. अनावश्यक येणाऱ्या वाहनांनी प्रवास टाळावा व जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक किरण भालेकर यांनी आवाहन केले आहे.

अधिक श्रावण मास व पुढे 26 सप्टेंबर पर्यंत श्रावण महिना असल्याने भाविक व पर्यटकांची गर्दी पाहता हॉटेल व्यावसायीक छोटे मोठे दुकानदार यांनी मोठ्या प्रमाणात माल खरेदी केलेला आहे. यासाठी अनेकांनी कर्ज घेतलेली आहेत.

पर्यायी वाहतूक व्यवस्था दुसरीकडून होणे सध्या तरी अशक्य आहे. करण दुसरीकडे रस्ते हे अवघड मार्गाचे आहेत. आणि पर्यायी व्यवस्था झाल्यास शिनोली ते तळेघर पर्यंत अनेक हॉटेल व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. असे हॉटेल व्यवसायिकांचे म्हणणे आहे त्वरित रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com