टाकळी हाजी गटात गावडे कुटुंबाचा विक्रम

टाकळी हाजी गटात गावडे कुटुंबाचा विक्रम
Published on

टाकळी हाजी, ता. १२ : जिल्हा परिषदेच्या इतिहासात सन १९६७पासून सलग ५८ वर्षे प्रतिनिधित्व करण्याचा विक्रम शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्यासह कुंटुबाने केला आहे.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी- शिरूर गटातून सन १९६७मध्ये पोपटराव गावडे प्रथम जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस पक्षाकडून निवडून गेले. त्यांनी सातत्याने सन १९९५पर्यंत या गटाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ते शिरूरमधून आमदार झाले. त्यानंतर टाकळी हाजी- कवठे येमाई गटातून त्यांचे चिरंजीव सोनभाऊ गावडे यांनी सन २००५पर्यंत १५ वर्षे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांची सून सुनिता गावडे यांनी १० वर्षे सदस्य, महिला बालकल्याण सभापती, शिरूर पंचायत समिती सभापती म्हणून काम केले. त्या सन २०१९पर्यंत सदस्या होत्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचाराशी ठाम राहत गावडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात काम केले. त्यांनी दोन वेळा शिरूरचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांना साथ दिली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐववेळी त्यांचे पुत्र राजेंद्र गावडे यांची उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी भाजपची उमेदवारी घेतली. कॉंग्रेस विचारांच्या या बालेकिल्ल्यात पोपटराव गावडे यांनी जिल्हा परिषदेमध्ये चिरंजीव राजेंद्र गावडे व पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले. त्यातून येथे फक्त ‘गावडे पॅटर्न’च चालतो, हे सर्वांना दाखवून दिले. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी, ‘मला पक्षाने धोका दिलायं- तुमची साथ हवीय,’ असे आवाहन करत पोपटराव गावडेनी भाजपचे कमळ फुलविले.
जिल्हा परिषदेमध्ये भाजपकडून राजेंद्र गावडे यांनी ३४४१, तर पंचायत समितीच्या कवठे येमाई गणात कांचन सांडभोर यांना ११०२; तर टाकळी हाजी गणात सुनिता कड यांना ११२३ मतांनी दणदणीत विजय संपादन केला.

ज्या पक्षासाठी प्रमाणिकपणे काम करीत दिवसरात्र राबलो, त्याच पक्षाने ऐनवेळेस डावलले, विरोधकाला जवळ केले. त्यामुळे जनतेच्या आग्रहाखातर भाजप पक्षात जाऊन निवडणूक लढविली. जनतेने ६४ वर्षे माझ्यावर ठेवलेला विश्वास पुन्हा नव्याने सिद्ध करून दाखविला आहे.
- पोपटराव गावडे, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com