अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करुन बनवले अश्लील व्हिडिओ

अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करुन अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या तीन विकृत तरुणांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला.
Crime
CrimeSakal
Summary

अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करुन अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या तीन विकृत तरुणांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकटवाडी - अल्पवयीन मुलांवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार (Sexually Abusing) करुन अश्लील व्हिडिओ (Pornographic Videos) तयार करणाऱ्या तीन विकृत तरुणांवर हवेली पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. ईश्वर अशोक शिंदे (वय 20), निलेश सुर्यकांत नेटके (वय 21) आणि कुणाल राजेश भांगरे (वय 20) (सर्व रा. डोणजे, ता. हवेली जि. पुणे.) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Crime
जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा सर्वर डाउन झाल्याने नागरिकांचा संताप

हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ईश्वर अशोक शिंदे हा सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळजाई टेकडीवर संशयास्पदरित्या आढळून आल्यानंतर स्थानिक पोलीसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये तो साथीदारांसह अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करत असतानाचे अश्लील व्हिडिओ आढळून आले.त्यानुसार सहकारनगर पोलीस ठाण्यात 'झीरो एफआयआर' दाखल करुन गुन्हा हवेली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

हवेली पोलीसांनी पीडीत मुलांना व पालकांना शोधून काढल्यानंतर धक्कादायक माहिती मिळाली आहे.आरोपींनी मारहाण करुन लैंगिक अत्याचार केला व कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पालकांच्या फिर्यादीवरून आरोपींवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार याबाबत अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com