पुणे - पबमध्ये मद्यपान करून सुसाट महागडी कार चालवत दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणात ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुखाने गुन्ह्यातून वगळण्याचा अर्ज केला आहे. त्याच्या अर्जावर आदेश झाल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपींवर आरोप निश्चित केले जाणार आहे.