
निरगुडसर : पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ व्यक्तीकडून एकूण दीड तोळ्याच्या तीन सोन्याच्या अंगठ्या चोरट्याने लांबवल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर पारगाव रस्त्यावर दातखिळे मळा फाट्यावर शुक्रवार (ता.०९) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यावर पारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.