लॉकडाउनमुळे सकारात्मक बदल; पक्षांसाठी झाले मोकळे आकाश..! 

लॉकडाउनमुळे सकारात्मक बदल; पक्षांसाठी झाले मोकळे आकाश..! 
Updated on

पुणे - लॉकडाउनच्या काळात शहरातील प्रदूषणाचे प्रमाण कमी होत असताना पर्यावरणातील इतर घटकांवरही सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मोकळे रस्ते आणि मानवी हस्तक्षेप होत नसल्याने विविध भागांमध्ये पक्षी व कीटकांचा वावर वाढला आहे. कीटकांमुळे परागण (पॉलीनेशन) प्रक्रियेत वाढ होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

लॉकडाउनमुळे प्रदूषणात झालेली घट आणि सध्याच्या तापमानामुळे कीटकांमध्ये बदल जाणवत आहेत. वाहनांचा धूर आणि उत्सर्जित किरणांचे (रेडिएशन) प्रमाण कमी झाल्यामुळे फुलपाखरांची संख्या वाढली आहे. तसेच 15 टक्‍क्‍यांनी कीटकांचा वावर वाढला असून याचा पर्यावरणाला फायदा होत आहे. कारण यामुळे परागण प्रक्रियेत वाढ झाली आहे. वनस्पतींच्या प्रजोत्पादनासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असते. कीटक हे पर्यावरणीय चक्रात महत्त्वाचा घटक आहेत. यापूर्वी शहरात प्रदूषणामुळे कीटकांचा वावर कमी असायचा. परंतु, आता प्रदूषण कमी झाल्याने विविध प्रकारचे कीटक दिसून येत आहेत. या बदलाचा भविष्यात पर्यावरणाला मोठा फायदा होऊ शकतो, अशी माहिती कीटकशास्त्रज्ञ डॉ. राहुल मराठे यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गाड्यांचे आवाज आणि मानवी वावर कमी झाल्याने पक्ष्यांचा वर्दळ वाढली आहे. दयाळ, नाचण, खंड्या, बुलबुल, वटवटे, शिंपी, शिंजिर इत्यादी पक्ष्यांचे आवाज शहरात सध्या दिवसभर ऐकू येतात. सध्या पक्ष्यांचा विणीचा हंगाम (ब्रिडिंग सीझन) सुरू असून त्यामुळे ते सतत गात असतात. यापूर्वी गाड्यांच्या वर्दळीमुळे सकाळच्या वेळेपुरते पक्षांचे आवाज ऐकू येत, असे पक्षीशास्त्रज्ञ धर्मराज पाटील यांनी सांगितले. 

लॉकडाउनमुळे पक्ष्यांच्या पथ्यावर! 
या हंगामात बहुतांशी पक्षी घरटी बांधतात. त्या घरट्यांना मानवाच्या सततच्या रहदारीमुळे होणारा त्रास लॉकडाउनमुळे कमी झाला आहे. गव्हाणी घुबड, पिंगळा, रातवा असे रात्रीचे पक्षीसुद्धा ध्वनी आणि प्रकाशाच्या प्रदूषणातून 
काही काळ तरी मुक्त झाले आहेत. एरवी पक्षीच नाही तर साप, सरडे, बेडूक, खार, मुंगूस आदी जिवांचे शहरी गजबजाटामुळे जगणे अवघड झाले होते. परंतु, सध्या त्यांचाही वावर वाढला असल्याचे पक्षीशास्त्रज्ञ धर्मराज पाटील यांनी सांगितले. 

यापूर्वी शहरात वाहनांचा आणि मानवी वावर जास्त असल्याने निसर्गातील या घटकांकडे दुर्लक्ष होत होते. नागरिकांना आपल्या जवळपास कोणते पक्षी आणि छोटे प्राणी आहेत, याकडे पाहण्यासाठी वेळ नसायचा. मात्र, लॉकडाउनमुळेनिसर्गातील या घटकांकडे त्यांचे लक्ष केंद्रित असून शहरात विविध पक्षी दिसून येत आहेत. 
- अनुज खरे, सदस्य, महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन मंडळ 

हवामान बदलाशी सामना... 
लॉकडाउनमुळे गेल्या चाळीस दिवसांत शहरातील प्रदूषणात मोठी घट झाल्याची नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमएपसीबी) केली आहे. मानवी कार्य ठप्प झाल्याने जागतिक तापमान वाढीला कारणीभूत असलेला कार्बन वायूसुद्धा कमी झाला आहे. परंतु, लॉकडाउन हा यावर कायमस्वरूपी पर्याय नाही. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने वाहनांचा वापर कमी केल्यास भविष्यातही प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे शक्‍य होईल, अशी अपेक्षा भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com