मानसिक उत्तेजकांचा आजारांवर सकारात्मक परिणाम - प्रा. विदिता वैद्य

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये (एनसीएल) आयोजित वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) स्थापना दिनाच्या कार्यक्रमात प्रा. विदिता वैद्य बोलत होत्या.
Vidita Vaidya
Vidita VaidyaSakal
Summary

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये (एनसीएल) आयोजित वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) स्थापना दिनाच्या कार्यक्रमात प्रा. विदिता वैद्य बोलत होत्या.

पुणे - मानसिक उत्तेजनेसाठी अगदी प्राचीन काळापासून सेरोटोनर्जिक सायकेडेलिक्सचा दैनंदिन जीवनात करण्यात येत आहे. विविध वनस्पती, अळिंबी, पेयोट, चहा, कॉफी आदी अन्न पदार्थांमधील सायकेडेलिक्स आजवर न नकळतपणे सकारात्मक परिणाम करत आहे, असे मत टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या शास्रज्ञ प्रा. विदिता वैद्य यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये (एनसीएल) आयोजित वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) स्थापना दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले यांनी सीएसआयआरचा इतिहास सांगितला. तर प्रा.वैद्य यांनी सायकेडेलिक्स संबंधीचे समज, गैरसमज, सांस्कृतिक अडथळे या संबंधी विवेचन केले. त्या म्हणाल्या,‘‘प्राचीन काळी अळिंबीचा वापर उपचारात्मक औषधी म्हणून केला जात असे. जगातील विविध भागांमध्ये सायकेडेलिक्स निर्माण करणाऱ्या वनस्पतींचे वर्गीकरण सांस्कृतिक दृष्ट्या आणि उपयोजन अनुसार करण्यात आले आहे. जसे की, उत्तेजक वनस्पती, चिंताग्रस्तता भासवणाऱ्या, उदासीनता कमी करणाऱ्या, भूल देणाऱ्या, उपशामक, वेदनाशामक आणि कामोत्तेजक वनस्पती. त्यांमधील सायलोसायबिन आणि केटामाइन हे घटक न्यूरोट्रांसमिशनवर खोलवर परिणाम करतात. शरीरातील विविध आण्विक प्रक्रियेमध्ये कार्य करतात.’’

गतकाळापासून सायकेडेलिक्स विषयी रूढी परंपरागत गैरसमज आहेत. बहुतेक सायकेडेलिक्स बेकायदेशीर आहेत कारण ते सामाजिक दृष्टीने अयोग्य समजले जातात. परंतु मागील काही दशकांपासून सायकेडेलिक विज्ञान विश्वात जागरूकता येत असून लोक आता सायकेडेलिक्स असणाऱ्या काही पदार्थांना स्वीकारू लागले आहेत, असे मतही प्रा. वैद्य यांनी व्यक्त केले. सीएसआयआर ही जागतिक स्तरावरील संशोधन संस्था म्हणून नावलौकीक कमावीत असल्याचे डॉ. लेले यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘हे दशक भारत आणि संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या उद्योजकता, तंत्रज्ञान आधारित उद्योग, संगणकीकृत उद्योग, जागतिक पुरवठा उद्योग साखळी यांकडे कल वाढला असून, हे नव्याने येणारे उद्योग भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगतीला चालना देणार आहेत.’’ कार्यक्रमात उत्तम कामगिरीसाठी संस्थेतील शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि संशोधक विद्यार्थ्यांना एनसीएल रिसर्च फाउंडेशनतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com