Inner Ring Road : मांजरी खुर्द पाठोपाठ कोलवडीतही ‘इनर रिंग रोड’साठी सकारात्मक प्रतिसाद; १५ ऑक्टोबरपासून होणार जमीन मोजणी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रस्तावित असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला आला वेग.
kolwadi meeting for inner ring road

kolwadi meeting for inner ring road

sakal

Updated on: 

मांजरी खुर्द - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रस्तावित असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी मांजरी खुर्द येथे झालेल्या बैठकीपाठोपाठ शुक्रवारी (ता. ९) कोलवडी (ता. हवेली) येथे झालेल्या मोजणीपूर्व बैठकीतही बाधित शेतकऱ्यांनी योग्य मोबदल्याच्या अपेक्षेसह सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या १५ ऑक्टोबरपासून जमिनीच्या मोजणीला सुरुवात करण्यात येणार असून, डिसेंबरअखेर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com