मुळशीत कोरोनाचा पुन्हा शिरकाव होण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

- लॉकडाऊन शिथील केल्याने पुण्यातील कोरोनाबाधित क्षेत्रातून मुळशीकर मंडळी रात्री-अपरात्री कुटुंबासह गावी येऊ लागली

पौड : लॉकडाऊन शिथील केल्याने पुण्यातील कोरोनाबाधित क्षेत्रातून मुळशीकर मंडळी रात्री-अपरात्री कुटुंबासह गावी येऊ लागली आहेत. गावकी-भावकी, नातंगोतं तसेच उर्मटपणाचा वादविवाद टाळण्यासाठी आलेल्या लोकांना हटकण्यात सरपंच, पोलिस-पाटीलही कचरत आहेत. त्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेल्या मुळशी तालुक्यात हिंजवडीप्रमाणेच पाहुण्यांच्या रूपाने कोरोनाचा पुन्हा शिरकाव होण्याची भीती वाढू लागली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेली दोन महिन्यांपासून पौड पोलिस, महसूल प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे पुण्याच्या सीमारेषेवर असलेल्या मुळशी तालुक्यात कोरोनाचा अटकाव झाला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थानिक तरूण मंडळीं, गावोगावचे लोकप्रतिनिधी यांनी परप्रांतीय मजूरांची सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवणीही केली. भूगाव, लवळे, घोटवडे फाटा, पौड, माले, बापूजीबुवा खिंड, सूस याठिकाणच्या पोलिसांच्या चेकपोस्टमुळे मुळशीमध्ये येण्यास पुण्यामुंबईतील मुळशीकर बंद झाली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तथापि, गेल्या आठवडाभरापासून तालुक्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली आहे. त्यामुळे चांदणी चौक ते मालेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली. पुण्यामुंबईमध्ये मात्र दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. लॉकडाऊनमधील शिथिलतेचा फायदा घेवून पुण्यातील बाधित क्षेत्रातील काही मंडळींची पावले पुन्हा गावाकडे वळू लागली आहे. ही मंडळी रात्रीअपरात्री घरी येत आहेत. नव्याने आलेल्या लोकांबद्दल ग्रामस्थांची दबकी चर्चा सुरू असते.    

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावकी - भावकी आणि नातंगोतं तसेच विचारल्यानंतर पुन्हा उलटे बोलल्यास अपमानित होवू नये यामुळे सरपंच, पोलिस पाटील या मंडळींना हटकण्यास दबकत आहेत. तहसीलदार अभय चव्हाण यांनी मुळशीत रहिवासासाठी आलेल्यांना क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु त्यास गावोगाव हरताळ फासलेला दिसत आहे.

पाहुण्याच्या रूपाने तालुक्यात हिंजवडी आणि माण येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे तो भाग सील करण्यात आला आहे. परंतु बाधित क्षेत्रातून मुळशी तालुक्यात गावाकडे येणाऱ्या मंडळींना पुण्यातच थोपविणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibilities of Found Corona Infected Patient in Mulshi