पुणेकरांनो, दुपारनंतर छत्री घेऊनच बाहेर पडा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

- दुपारनंतर बाहेर पडताना जवळ छत्री ठेवा.

- दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांनी जर्किन, रेनकोट सोबत ठेवा.

पुणे : पुणेकरांनो, दुपारनंतर बाहेर पडताना जवळ छत्री ठेवा. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांनी जर्किन, रेनकोट सोबत ठेवा. कारण, दुपारनंतर शहरात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरात आजच्या दिवसाची सुरवात पावसाच्या सरींनी झाली. कोथरुड, सिंहगड रस्ता, पाषाण या भागात सकाळी पावसाच्या एक-दोन मोठ्या सरी पडल्या. सकाळी अकरा वाजल्यापासून ढगांमधून बाहेर आलेला सूर्य पुन्हा दिसू तळपू लागला. त्यामुळे दुपारपर्यंत कमाल तापमानाचा पारा वाढेल. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर वेधशाळेत कमाल तापमान 31.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरासरीपेक्षा ते 2.1 अंश सेल्सिअस कमी होते. पण, कमाल तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील बहुतांश भागात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होईल. पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibilities of Rain today in Pune