विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता

विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता

पुणे : मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी रविवारी (ता. 12) मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. तर, सोमवारी (ता. 13) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. दरम्यान कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील, असेही हवामानशास्त्र विभागातर्फे सांगण्यात आले आहे. 

विदर्भात शनिवारीही उष्णतेची लाट कायम होती. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते; तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण होते. राज्यात चंद्रपूरमध्ये 45.2 अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद झाली. पुण्यात 38.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

विदर्भात उष्णतेची लाट अजूनही कायम असून अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा येथे 42 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंदविले गेले. राज्यात सोमवारपासून (ता. 13) हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता वाढेल, असा अंदाज आहे. 

महाबळेश्‍वरमध्ये आल्हाददायक गारवा

राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा तीव्र कडाका जाणवत असताना महाबळेश्‍वरमध्ये मात्र हव्याहव्याशा वाटणाऱ्या गारव्याचा आल्हाददायक अनुभव घेता येत आहे. महाबळेश्‍वरमध्ये शनिवारी 16.8 अंश सेल्सिअस अशा किमान तापमानाची नोंद झाली आहे. ऐन उन्हाळ्यात गारव्याचा अनुभव घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून असंख्य पर्यटक महाबळेश्‍वरमध्ये दाखल होत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com