शहर आणि परिसरात हलक्‍या सरींची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

पुणे शहर आणि परिसरात येत्या शनिवारी (ता. २८) ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता ५१ ते ७५ टक्के आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला.  

पुणे - पुणे शहर आणि परिसरात येत्या शनिवारी (ता. २८) ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची शक्‍यता ५१ ते ७५ टक्के आहे, असा अंदाज हवामान खात्यातर्फे शुक्रवारी वर्तविण्यात आला.  

सौराष्ट्र, कच्छ आणि अरबी समुद्रावर चक्रावत निर्माण झाला आहे, त्यामुळे शहर आणि परिसरातील बाष्प तिकडे सरकत आहे. त्याचा थेट परिणाम हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होण्यावर होईल. पुढील काही दिवस हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी राहणार आहे. असे असले तरीही पुढील चोवीस तासांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, अशी शक्‍यता हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी यांनी व्यक्त केली. पुण्यात या महिनाखेरपर्यंत आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून, हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होणार असल्याने कमाल तापमानाचा पारा ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of rain in the city