
पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व धोकादायक ठिकाणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालासाठी दहा दिवसांची मुदत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. सात विभागांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल दिले आहेत, इतर विभागांना दहा दिवसांत अहवाल द्यावा लागणार आहे.