Vidhan Sabha 2019 : आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे; चंद्रकांत पाटलांविरोधात फलकबाजी

विनायक बेदरकर
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

कोथरूड : ''कोथरूड भागात दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे. आम्ही कोथरूडकर'', अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या फलकबाजीमधून पक्ष श्रेष्ठीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. 

Vidhan Sabha 2019 : कोथरूड : ''कोथरूड भागात दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे. आम्ही कोथरूडकर'', अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या फलकबाजीमधून पक्ष श्रेष्ठीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. 

कोथरूडमधून भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे अशा प्रकारच्या फलकबाजी मधून चंद्रकांत पाटील यांना लक्ष करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

पुणे शहर प्रत्येक निवडणुकी दरम्यान चर्चेत राहिलेले शहर असून निवडणुकीच्या काळात अनोख्या प्रकारच्या पोस्टरबाजीमधून लोकप्रतिनिधींना लक्ष्य केलं जातं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कसबा आणि कोथरूडमध्ये उमेदवार कोणता आणि कसा पाहिजे? अशी टिपणी करणारे फलक लावण्यात आले आहे.

पुण्यात सुरुवातीला कसबा विधानसभा मतदारसंघात ''आमचं पण ठरलंय, कसबा विधानसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार नको, अशा आशयाचे फलक काँग्रेस कार्यकर्त्यांकडून लावल्याची चर्चा शहरात ऐकण्यास मिळाली. यातून पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आली. ही चर्चा थांबत नाही, तोच ''कोथरूड भागात दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे - आम्ही कोथरूडकर'' अशा आशयाची फलकबाजी करण्यात आली. या फलकबाजी मधून राज्याचे महसुल मंत्री आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी या असून त्या पुन्हा निवडणुक लढविण्यास इच्छुक होत्या. तसेच नगरसेवक मुरलीधर मोहोळ देखील तीव्र इच्छुक होते. मात्र ऐनवेळी चंद्रकांत पाटील यांचे नाव पुढे आल्याने, त्या नाराज असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात निवडणूक जस जशी जवळ येईल. तशी रंगत वाढणार हे निश्चित मानले जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: poster against Chandrakant Patil in kothrud for Vidhan Sabha 2019