'गर्ल्स' चित्रपटाचे पोस्टर वादाच्या भोवऱ्यात; सलील कुलकर्णी नाराज

Girls-Poster-and-Salil-Kolh.jpg
Girls-Poster-and-Salil-Kolh.jpg

'गर्ल्स' या मराठी चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले. विशाल देवरुखकर दिग्दर्शित हा युथफुल चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाच्या एका पोस्टरवर 'आयुष्यावर बोलु काही' ही टॅगलाईन वापरल्याने संगीतकार सलील कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनतर ते पोस्टर सोशल मिडियावरुन काढून नवीन पोस्टर पोस्ट केले आहे.

'आयुष्यावर बोलु काही' हा सलील कुलकर्णी यांचा लोकप्रिय 'शो' गेली सोळा वर्षांपासून सुरु आहे. नाती, कुटुंबा यावर भाष्य करणाऱ्या 'शो'च्या नावाची झालेली थट्टा योग्य नसल्यामुळे त्याचा त्यांनी जाहीर निषेध केला.

'गर्ल्स' चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये एक अभिनेत्रीने परिधान केलेल्या टॉपवर 'आयुष्यावर बोलु काही ' आणि #FamilySucks  अशी टॅगलाईन वापरण्यात आली होती. याबाबत, ''लोकप्रिय, हाऊसफुल्ल शोच्या नावाचा गैरवापर करणे अपमानकारण आणि अयोग्य असल्याचे'', सलील कुलकर्णी यांनी म्हटले आहे. त्यांच्या चाहात्यांनीही या पोस्टरवर टिका करीत निषेध सोशल मिडीयावर व्यक्त केला.



या प्रकरणाची दखल घेत, चित्रपटाच्या सोशल मिडिया टीमने ते पोस्टर काढून टाकले आहे. नवीन पोस्टर सोशल मिडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

''सकाळच्या पोस्टरमुळे काही गैरसमजुती निर्माण होऊन, काही ठिकाणी चुकीचे मेसेज फिरवले जात आहेत. आमचा 'गर्ल्स' हा सिनेमा यूथफुल असला तरी कुटुंबासोबत बघता यावा असा आहे. आम्ही हे पोस्टर कोणालाही दुखावण्याच्या हेतूने बनवलेले नाही. आपण सगळे एका कुटुंबासारखेच आहोत या भावनेने आम्ही नवीन पोस्टर सादर करत आहोत. ''असे मेसेज पोस्ट करत गर्ल्स चित्रपटाचे नवीन पोस्टर टाकले ज्यावर अभिनेत्रीने परिधान केलेल्या टॉपवर #FamilySucks एवढेच टॅग लाईन आहे. आयुष्यवर बोलु काही ही टॅगलाईन काढण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com