सतत पडणाऱ्या पावसामुळे फुलोऱ्यात आलेले बटाटा पिक धोक्यात

आदर्शगाव कुरवंडी, पेठ, थुगाव, कारेगाव, भावडी, पारगाव तर्फे खेड, कोल्हारवाडी आदी गावे बटाट्याचे आगर म्हणून ओळखली जातात.
Potato Crop
Potato CropSakal
Updated on
Summary

आदर्शगाव कुरवंडी, पेठ, थुगाव, कारेगाव, भावडी, पारगाव तर्फे खेड, कोल्हारवाडी आदी गावे बटाट्याचे आगर म्हणून ओळखली जातात.

मंचर - आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात गेली आठ दहा दिवस दररोज पाऊस पडत आहे. ढगाळ हवामान व पावसामुळे खरीप हंगामातील फुलोऱ्यात आलेले सहा हजार एकर क्षेत्रातील बटाटा पिकाला धोका होण्याची शक्यता आहे. साचलेले पाणी काढून देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. पावसाने उघडीप न दिल्यास हाता तोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

आदर्शगाव कुरवंडी, पेठ, थुगाव, कारेगाव, भावडी, पारगाव तर्फे खेड, कोल्हारवाडी आदी गावे बटाट्याचे आगर म्हणून ओळखली जातात. यापूर्वी दरवर्षी दहा हजार एकर क्षेत्रात खरीप हंगामात शेतकरी बटाटा लागवड करत होते. पण बाजारभावात स्थिरता नसल्याने व उत्पादन खर्च भागविण्यासाठी शेतकर्यांना कसरत करावी लागते. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून बटाटा लागवड क्षेत्रात घट होत चालली आहे. सोयाबीन, मका, वटाणा आदी पिकाकडे शेतकरी वळला असल्याने या पिकाचे लागवड क्षेत्र वाढत चालले आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात व जुलैच्या पहिल्या आठवड्यात येथील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली. आता सदर बटाटा काढणी योग्य झाला आहे. पण बटाटा काढणीचे काम पावसामुळे रखडले आहे. परिणामतः ३०० एकर क्षेत्रातील बटाटे जमिनीतच सडण्याची भीती भावडी येथील बटाटा उत्पादक शेतकरी अशोक बाजारे यांनी व्यक्त केली.

'ता.२१ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत पाच हजार ७०० एकर क्षेत्रातील पिक फुलोऱ्यात आहे. जमिनीत बटाट्याची वाढ सुरु झाली आहे. पण पडत असलेला पाऊस हि अडचणीचा ठरू शकतो. या पिकात साचलेले पाणी काढून देण्याचे काम सुरु आहे.' असे पेठ येथील शेतकरी राम तोडकर यांनी सांगितले.

'सातगाव पठारभागात गेली आठवडाभर सततच्या पावसाने बटाटे काढणीची कामे खोळंबली आहेत. चिखल झाल्यामुळे पिकात जाता येत नाही. काही शेतकऱ्यांचे बटाटे खराब झाले आहेत. कृषी विभागाने या परिसराचा पाहणी दौरा करून ताबोडतोब पंचनामे सुरु करावेत.'

- मनीषा तोत्रे, सरपंच आदर्शगाव कुरवंडी (ता.आबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Marathi News Esakal
www.esakal.com