Harvesting of potatoes for the Rabi season has begun.
sakal
पारगाव - आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात यावर्षी कमी पाऊस झाल्याने दुष्काळी झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. त्यातच वातावरणातील सततच्या बदलामुळे रब्बी हंगामातील बटाटा उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्क्यांनी मोठी घट झाली आहे. एकीकडे एकरी उत्पादन खर्च ५० ते ६० हजार रुपयांपर्यंत पोहोचला असताना, दुसरीकडे मागील वर्षीच्या तुलनेत बाजारभाव निम्माच मिळत असल्याने बटाटा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.