

खोडद, ता. १२ : पाण्याचे नियोजन... तंत्रज्ञानाचा वापर... कंपोस्ट खत... कोंबड खत... शेणखताचा वापर करून मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील बेलशेत मळ्यातील शेतकरी दत्तात्रेय बाळू थोरात व शार्दुल बाळू थोरात या दोन भावांनी दोन एकर क्षेत्रात २० टन बटाट्याचे उत्पादन घेतले आहे. यातून चार लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे थोरात यांना तीन महिन्यांत दोन लाख ६० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
थोरात बंधूंनी उत्पादित केलेल्या बटाट्याला १९० ते २१० रुपये दहा किलोला बाजारभाव मिळाला. या पिकासाठी दोन एकरांसाठी १ लाख ५० हजार रुपयांचा खर्च आला आहे. लागवडीनंतर तीन महिन्यांनी (९ नोव्हेंबर रोजी) ट्रॅक्टरच्या साहाय्याने बटाटा काढण्यात आला. ऐन दुष्काळी परिस्थितीत एकरी १० टन बटाट्याचे उत्पादन घेतले आहे.
थोरात बंधूंनी ऑगस्ट महिन्यात दोन एकर क्षेत्रात काडीकचऱ्याचे विघटन करून तयार केलेले कंपोस्ट खत, शेणखत व कोंबड खत सर्वत्र पसरून घेतले. रासायनिक खतांचा अत्यल्प प्रमाणात वापर केला. दोन ओळींतील अंतर चार फूट ठेवले. पुखराज वाणाचे बटाट्याचे बेणे आणून आठ ऑगस्ट रोजी दोन एकरांत १८ गोण्यांची लागवड केली. बटाटा पिकाला ठिबकद्वारे पाणी देण्यात आले.
दृष्टिक्षेपात
- अन्नद्रव्यांची पूर्ती करण्यासाठी जिवाणू खतांचा वापर
- अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचा वापर
- अन्नद्रव्ये विरघळण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणूंचा वापर
- बटाट्याची वाढ होण्यास व पानांचा आकार वाढण्यास मदत
कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी जैविक कीटकनाशके आणि बुरशी नियंत्रणासाठी बुरशीनाशकांच्या आठवड्याआड अशा प्रकारे फवारण्या केल्या. त्यामुळे कीड आणि रोग नियंत्रणासाठी जास्त कष्ट करण्याची गरज पडली नाही. पांढऱ्या माशीसाठी, अळीसाठी व कोळीसाठी पाच रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली.
पावसाळी व हिवाळी परिस्थितीत बटाट्याची लागवड झाल्यामुळे, या पिकावर पडणारा अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी अन्नद्रव्यांचा वापर केल्याने वातावरणातील घटक प्रतिकूल असतानाही बटाटा तग धरून राहिला. सेंद्रिय निविष्ठांचा वापर केल्याने पिकाची गुणवत्ता वाढली.
- रवींद्र थोरात, संचालक, श्री साई कृषी सेवा केंद्र, मांजरवाडी
अनेक वर्षे शेतीचा अनुभव असल्याने पिकाच्या मुळीला अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा वापर केला. त्यामुळे बटाट्याचे वजन आणि आकार वाढण्यास मदत झाली. सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा वापर केल्याने पिकाचा विकास झाला.
- दत्तात्रेय थोरात, शेतकरी, मांजरवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.