फुरसुंगी वाहतूक पोलिसांकडून खड्डे बुजवण्याचे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pothole filling work by Fursungi traffic police pune

फुरसुंगी वाहतूक पोलिसांकडून खड्डे बुजवण्याचे काम

फुरसुंगी : रस्त्याची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी यातून काहीसा मार्ग काढता यावा यासाठी फुरसुंगीत वाहतूक शाखा पोलिसांकडून येथील खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले.आठवडाभर झालेल्या पावसाने मुख्य मार्गावरील खड्डे पुन्हा मोकळे झाले आहेत.यामध्ये पाणी साठून दुचाकी चालकांना अंधाज येत नसल्याने कसरत करत गाडी चालवावी लागत आहे. जड वाहतूक जास्त असल्याने खड्ड्यांचे आकार वाढत चालले आहेत.प्रशासनाकडून काम रखडत आहे.परंतु तोपर्यंत पोलिसांची नागरिकांची होणारी गैरसोय आणि सुरक्षा पाहता स्वताहून धोकादायक खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला.

यासाठी त्यांनी एका दुकानदाराची पडलेली खडी घेण्याबाबत विचारले.त्याने ही लगेच मान्यता दिल्याने पोलिसांनी स्वता खडीच्या पाट्या उचलून खड्डे बुजवण्याचे काम केले.असे हडपसर वाहतूक पोलीस संतोष राठोड यांनी सांगितले. प्रशाषणा दोष देण्यापेक्षा आपण प्रत्येकाने एक खड्डा बुजवला तर हा मार्ग खड्डे मुक्त होण्यास वेळ लागणार नाही आणि येथील नागरिकांच्या सुरक्षतेतच्या दृष्टीने एक पाऊल उचलल्या जाईल,असे पोलिस कर्मचारी शरद धांडे,दादासाहेब कायगुडे यांनी सांगितले.

Web Title: Pothole Filling Work By Fursungi Traffic Police Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..