
औंध : महापालिकेने काही महिन्यांपूर्वी पाषाण-सुतारवाडी रस्त्यावरील स्मशानभूमी ते शिवनगर, गिरिराज चौकापर्यंत चेंबरचे काम केले होते. परंतु ठेकेदाराने अर्धवट काम केल्याने सुतारवाडी स्मशानभूमी ते गिरिराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचून राहत असल्याने त्यात वाहने आदळून अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सुतारवाडीतील हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी मनसेने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.