

court
sakal
पुणे - खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या वाहनचालकांना आता विधी सेवा प्राधिकरणात भरपाईचा दावा दाखल करता येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश डी. पाटील यांच्या खंडपीठाने खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यात नागरिकांच्या जीवन आणि सुरक्षिततेच्या अधिकाराचे रक्षण करणाऱ्या ऐतिहासिक निकालामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे.