Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन
MNS: पुणे शहरातील खडकमाळ आळी ते शितळादेवी चौक मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना होणारा त्रास वाढला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी रांगोळी घालून खड्ड्यांचे पूजन केले.
पुणे: खडकमाळ आळीतील चर्च ते शितळादेवी चौक दरम्यान रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. वाहनचालकांसह पादचाऱ्यांना येथून मार्गक्रमण करताना कसरत करावी लागत आहे.