
बनावट सौदर्य प्रसादने तयार करणाऱ्या सहा जणांकडून पोलिसांनी २८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बोगस सौदर्य प्रसाधने विकणाऱ्यांचे भांडे फुटले; २८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
लोणी काळभोर - हिंदुस्थान युनीलिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौदर्य प्रसादने तयार करणाऱ्या सहा जणांकडून पोलिसांनी २८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि घटना औताडेवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. २८) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
नारायण लालजी मेरा (वय ४५ रा. देवदया नगर सोसियटी, ठाणे वेस्ट मुंबई), लिनेश हिराचंद गाला वय ४७, रा. नाहुर व्हिलेज, मुलुंड वेस्ट, मुंबई), प्रवित्र जगबंधु पात्रा वय ३१, रा. नयखंडी, तहसिल खैरा जिल्हा- बालेश्वर, राज्य ओडीसा), निशिकांत खेत्रमोहन पात्रा (वय-२५ रा. नयखंडी, तहसिल खैरा जिल्हा बालेश्वर, राज्य ओडीसा), मानस बाबुली पात्रा वय १९ वर्ष, रा. नयखडी, तहसिल खैरा जिल्हा बालेश्वर, राज्य ओडीसा), गीतम निरंजन मिडघा (वय २९, रा. मधमग्राम, तहसिल मतस्वर, जिल्हा- बडघमवाडी, राज्य- वेस्ट बंगाल, सध्या सर्वजन रा. औताडवाडी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिपक बाबूलाल पटेल (वय-४३ रा. प्लस सोसायटी, जयनगर मारवे रोड, मालाड वेस्ट, मुंबई) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान कंपनीमार्फत वितरीत होणारी साधने यासंदर्भात कोणी फेरफार करीत असल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश दीपक पटेल यांना कंपनीने दिले आहेत. मंगळवारी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजेंद्र दराडे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, औताडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत गोडाऊन मध्ये काही इसम हे वेगवेगळ्या नामाकित कंपनीचे सौदर्य प्रसाधनाचे नक्कल करून बनावट माल तयार करीत आहेत. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
त्यानुसार सदर माहितीची खात्री करण्यासाठी नऊ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचलो. त्यानुसार सदर गोडाऊनमध्ये प्रवेश करुन छापा टाकला. यावेळी सदर सहा इसम हे गोडावून मध्ये मिळून आले. यावेळी त्यांना नावे विचारली असता त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. तसेच नारायण मेरा याने हे गोडावून भाड्याने घेतले आहे व बाकीचे हे माझ्याकडे कामगार असल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी गोडावून मध्ये तपासणी केली असता पोलिसांना वेगवेगळ्या कंपनीचे सौदर्य प्रसाधने बनविण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. यावेळी पोलिसांनी मेरा याच्याकडे सौदर्य प्रसाधने बाबत विचारपूस केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. तसेच ब्रँडेड कंपनीची हुबेहूब प्रसाधनाची हुबेहूब नक्कल तयार करून बाजारात विक्री करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार कंपनीतील अधिकाऱ्याशी संपर्क करून माहिती घेतली. त्यानुसार पोलिसांनी स्ट्रिक्स, लॅकमी, लॉरेअल, मॅट्रिक्स, लॅकमी 9to5, लॅकमी outer अशा बनावट कंपनीची २८ लाख २६ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Web Title: Pots Of Bogus Cosmetics Sellers Burst Assets Worth Rupees 28 Lakh 50 Thousand Confiscated Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..