बदल घडविण्याची ताकद डिझाइनमध्येच - खोसला

Ishana-Khosala
Ishana-Khosala
Updated on: 

‘लेक्‍सस’प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय ‘पर्ल ॲकॅडमी’तर्फे शुक्रवारी व शनिवारी होत असलेल्या ‘पुणे डिझाइन फेस्टिव्हल’साठी ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे. डिझाइनविषयी नवकल्पनांचा जागर मांडणाऱ्या ‘पुणे डिझाइन फेस्टिव्हल’चे यंदा १४ वे वर्ष आहे. यानिमित्त फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या ‘ईशान खोसला डिझाइन’ आणि ‘द टाइपक्राफ्ट इनिशिएटिव्ह’चे सहसंस्थापक ईशान खोसला यांनी व्यक्त केलेल्या भावना... 

मी एक डिझायनर, शिक्षक आणि संशोधक आहे. आपल्या संस्कृतीच्या विविध पैलूंचा वेध घेत डिझाइनच्या अंगाने त्याचा अभ्यास करणे, हे माझे आवडते काम आहे. ‘वैविध्य’ हे डिझायनिंग क्षेत्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, असे मला वाटते. यंदाच्या ‘पुणे डिझाइन फेस्टिव्हल’मध्ये मी ‘द टाइपक्राफ्ट इनिशिएटिव्ह’साठी केलेल्या कामाविषयी बोलणार आहे. आदिवासी किंवा पारंपरिक कलांच्या आधारे जगातील पहिला ‘टाइपफेस’ तयार करताना आलेले अडथळे आणि त्यावर केलेली मात या विषयीही आतापर्यंत फारशी कोणाला माहीत नसलेली गोष्टही सांगणार आहे.

आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये बदल घडविण्याची ताकद डिझाइनमध्ये आहे; पण अनेकदा हे बलस्थान वापरलेच जात नाही.  उदाहरणार्थ, पर्यावरणाला धोकादायक असलेल्या पॅकेजिंगची भलामण करणारे डिझाइन तयार केले, तर त्याचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम नक्कीच होणार नाही; केवळ उत्पादनांच्या खपासाठीच त्याचा वापर होईल. जबाबदारीने डिझाइन करणे हे आज अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्याचसाठी डिझायनर्सनी आपली भूमिका निभावणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Agitation In Pune Muralidhar Mohol Questions Students On Protest Restart After Meeting With Maharashtra Government
Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern
Sharad Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com