भोसरी - भोसरी एमआयडीसीतील जे, एस, डब्ल्यू, इएल ब्लॉकमधील विद्युत पुरवठा शुक्रवारी (ता. ३) सकाळी आठ वाजल्यापासून खंडीत झाल्याने सुमारे एक हजार कंपन्यातील कामगारांना बसून पगार देण्याची वेळ लघुउद्योजकांवर आली आहे. त्याचप्रमाणे तयार मालाची मोठ्या कंपन्यांना डिलिव्हरी न झाल्याने कंपन्यांद्वारे बसणाऱ्या दंडाचेही (डेबीट) नुकसान लघुउद्योजकांना सहन करावे लागणार आहे.