
वाकड : ‘आयटीयन्स’ची वसाहत अशी वाकडची ओळख. मात्र, येथील उच्चभ्रू सोसायट्यांचा पिंक सिटी परिसर सोमवारी (ता. २३) २५ तासांहून अधिक काळ अंधारात होता. त्यामुळे रहिवासी आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या आयटी अभियंत्यांचे कामकाज ठप्प झाले. त्यामुळे महावितरण नेमकं करतंय काय? असा उद्विग्न सवाल रहिवासी करत आहेत.