
चाकण (ता. खेड) - येथील औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी सुरूच आहे. पोलीस जरी म्हणत असले गुन्हेगारी नियंत्रणात आहेत परंतु गुन्हेगारी डोकं वर काढते. घटना या घडतच असतात. औद्योगिक वसाहतीत भंगार व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे.त्याच्यातून कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. औद्योगीक वसाहतीत ठेकेदारी मिळविणारे व गुन्हेगारी कागदावर येऊन न देणारे काही आका आहेत आणि त्या आकांचेही आका आहेत हे वास्तव आहे.