
पुणे : महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नव्याने मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार शंभर युनिट वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) दरमहा १२.७६ रुपयांनी कपात होणार आहे. तीनशे युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीजबिल जवळपास दरमहा २४५ रुपयांनी; तर पाचशे युनिट वीज वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीजबिल दरमहा जवळपास ५०६ रुपयांनी वाढणार आहे.