प्रा. प्राची अशोकराव जगताप–इंगळे यांना पीएच . डी . पदवी प्रदान
SAS26B01151
प्रा. प्राची इंगळे
प्रा. प्राची इंगळे यांना पीएच. डी. प्रदान
..........
सासुरे : बार्शीतील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. प्राची अशोकराव इंगळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक तापमानवाढी संदर्भात जाणीव-जागृती कार्यक्रमाची निर्मिती व त्याची परिणामकारकता अभ्यासणे’ या विषयावर सखोल संशोधन करून ही पदवी संपादन केली. सदर संशोधन कार्य त्यांनी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य व मार्गदर्शक प्रा. डॉ. सुग्रीव श्रीमंत गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. प्रा. प्राची इंगळे या प्रताप ज्युनिअर कॉलेज, वडणगे येथे अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे, कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे आदींचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

