सासवड - सासवड (ता. पुरंदर) येथील प्राजक्ता विराज जगताप- कुरुलकर यांनी सनदी लेखापाल (सीए) ही अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. मे २०२५ मध्ये झालेल्या सी.ए. अंतिम परीक्षेत यश संपादन करून त्यांनी आपल्या गुणवत्तेची मोहोर उमटवली..प्राजक्ता यांचे शालेय शिक्षण सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले. त्यांना इयत्ता चौथीमध्ये शिष्यवृत्ती मिळाली होती. विशेष म्हणजे, महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत त्या इयत्ता ८ वी, ९ वी आणि १०वीमध्ये सलग राज्यस्तरीय शिष्यवृत्तीच्या मानकरी ठरल्या होत्या..याशिवाय, इयत्ता ८ वीमध्ये ऑल इंडिया मॅथ्स अँड सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत त्यांनी भारतातून तिसरा क्रमांक पटकावून आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली होती. इयत्ता १० वीमध्ये त्यांनी शाळेत सर्वप्रथम येत ९२.२५ टक्के गुण मिळवले होते.महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथील आर. ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स माटुंगा (मुंबई) येथून घेतले..१२ वीमध्ये त्यांना ८८.९० टक्के गुण मिळाले. सी.ए.च्या खडतर प्रवासात त्यांनी फाउंडेशन आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या. एम. पी. चितळे फोर्ट, मुंबई या सी.ए. फर्ममध्ये त्यांनी तीन वर्षांची आर्टिकलशिप पूर्ण केली..प्राजक्ता यांना काका सी.ए. रितेश पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले. वकील प्रकाश दीक्षित यांच्या त्या नात असून, उद्योजक विजय जगताप आणि सासवडचे माजी उपनगराध्यक्ष उमेश जगताप यांच्या त्या स्नूषा आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.