
पुणे : प्राजक्ताने राज ठाकरेंना करून दिली भोग्यांची आठवण
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरण्यासाठी बुधवारची (ता. 4) डेडलाइन दिली आहे. असे असतानाच आता मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही उद्यापासून गोंगाट बंद होईल, अशी अपेक्षा बाळगते, असे ट्विट करून आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. तसेच, राज ठाकरे यांना आठवणही करून दिली आहे. ठाणे आणि औरंगबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा; त्यानंतर मंदिरांवरील भोंगे उतरवू असे सांगितले. तसेच, ज्या ठिकाणी मशिदींवर भोंगे सुरु आहेत, त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा आदेशच "मनसे" कार्यकर्त्यांना दिला. राज्य सरकार व पोलिसांनी यात लक्ष घालावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.
जर कुणी ऐकत नसेल तर पुढे महाराष्ट्रात काय होईल, हे मला माहित नाही, असा इशाराच ठाकरे यांनी दिला. त्यामुळे राजकारण तापले असून बुधवारी नक्की काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागते आहे. भोंग्यांचे प्रकरण तापले असतानाच आता त्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज ट्विट करून राज ठाकरेंना भोंगे उतरविण्याची आठवण करून दिली आहे.
काय आहे प्राजक्ताचे ट्विट
" सगळ्यांना सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्राथना.
सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा.
असो....
आज 3 तारिख, उद्यापासून गोंगाट बंद होईल, अशी आशा बाळगते. # शांतताप्रिय
धन्यवाद मा. श्री. राज ठाकरे
@raj_shrikant_thackeray
उत्तर प्रदेशात 53 हजार भोंगे उतरविले
उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील जवळ्यास 53 हजारांहून अधिक भोंगे उतरविण्यात आले आहे. त्याबदद्ल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन होत आहे. योगी भोंगे उतरवू शकतात, मग महाराष्ट्रात का शक्य नाही, अशी चर्चा समाज माध्यमांसह सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
Web Title: Prajekta Reminded Raj Thackeray Bhonga
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..